
सावंतवाडी : अपघातात पाय जायबंदी झालेल्या वृध्दाला वेळेत रुग्णवाहीका तसेच कोणतीही गाडी उपलब्ध न झाल्यामुळे सावंतवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी अमित राउळ यांनी अपघातग्रस्तास उचलून धावत धावत रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या कृतीच सर्वत्र कौतुक होत आहे.
तीन मुशी परिसरात घडली बाळा राउळ (वय 65, रा. घावनळे) असे त्या जखमी वृध्दाचे नाव आहे. पोलिस कर्मचार्यांनी दाखविलेल्या समयसुचकतेमुळे श्री.राउळ यांचे कौतूक होत आहे. वेगाने येणार्या दुचाकी चालकाने गाडीला धडक दिल्यामुळे श्री. राउळ हे जमखी अवस्थेत तीन मुशी परिसरात गाडीसह कोसळले. यात त्यांचा पाय जायबंदी झाला. यावेळी त्याठीकाणी अनेकांनी धाव घेतली. मात्र, गाडी थांबवून सुध्दा कोणी गाडी थांबविली नाही. 108 रुग्णवाहीकेला फोन केला. परंतू पंधरा मिनिटे झाली तरी रुग्णवाहीका आली नाही. अखेर हा सर्व प्रकार पाहणार्या पोलिस कर्मचारी अमित राउळ यांनी जखमी यांना उचलून घेत धावत धावत रुग्णालय गाठले. त्यांचे हे मदतकार्य पाहून रुग्णालयातील डॉक्टरांसह जखमीच्या नातेवाईकांनी त्यांचे कौतूक केले.