LIVE UPDATES

वेंगुर्ला उभादांडा येथे गांजा जप्त

एका आरोपी ताब्यात
Edited by: दीपेश परब
Published on: July 05, 2025 11:47 AM
views 199  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा बागायतवाडी येथील कोठारेश्वर मंदिरासमोर सुमारे ११ हजार रुपये किमतीचा गांजा वेंगुर्ला पोलिसांनी जप्त केला. ४ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्याने ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी येथीलच प्रसाद प्रकाश तुळसकर (32) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मनोज परुळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुंगीकारक औषधी द्रव्य व मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ बाळगल्याप्रकरणी १९८५ चे कलम ८(c), २०(B)(ii)(a) नुसार आज ५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. यातील आरोपी प्रसाद प्रकाश तुळसकर याच्याकडून १० हजार ९८० रुपये किमतीचा ३६६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. 

     वेंगुर्ला बागायतवाडी कोठारेश्वर मंदिर समोरील रस्त्यावर पेट्रोलिंग वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतरी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलिस हवालदार योगेश सराफदार, जोसेफ डिसोझा, योगेश रावूळ, पोलिस नाईक स्वप्नील तांबे, पांडुरंग खडपकर, मनोज परुळेकर, प्रथमेश पालकर, जयेश सरमळकर, महिला पोलिस गौरी ताम्हणेकर, होमगार्ड तेजस्वी धुरी यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड करीत आहेत.