गव्याची धडक बसून रिक्षा पलटी

Edited by: विनायक गावस
Published on: June 06, 2025 21:34 PM
views 620  views

सावंतवाडी : माजगाव येथे गवा रेड्याची रिक्षाला धडक बसून या धडकेत रिक्षा पलटी झाली आहे. दत्तमंदिर येथे हा प्रकार घडला आहे. 


यात प्रवाशांना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर दोन्हीकडून वाहनांची दुतर्फा गर्दी झाली आहे. यात रिक्षाच मोठं नुकसान झालं आहे. तसेच परिसरात घबराट पसरली आहे.