
सावंतवाडी : महावितरणची मेन लाईन तुटल्याने सावंतवाडी शहरासह लगतच्या गावातील विद्युत पुरवठा रात्री १० च्या सुमारास अडीच तास खंडीत झाला. विद्युत पुरवठा बराचवेळ सुरु न झाल्यानं नागरिकांना महावितरणला संपर्क केला असता टेलीफोन लागला नाही. तसेच कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिक आक्रमक झाले. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशीरा विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर उप अभियंता कार्यालयात आले. यावेळी त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्या मेडिकलची मागणी केली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. तसेच महावितरणचे अधिकारी श्री. राक्षेंनी माफी मागितल्यावर वातावरण शांत झालं.
सावंतवाडी शहरासह लगतच्या गावातील विद्युत पुरवठा रात्री १० च्या सुमारास खंडीत झाला. बारचवेळ विद्युत पुरवठा सुरळीत चालू न झाल्याने नागरिकांनी महावितरणला संपर्क केला असता फोन लागला नाही. यामुळे नागरिकांनी महावितर कार्यालयात धाव घेतली. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल झाले. रात्री १२ च्या सुमारास विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यात आला. यानंतर उप अभियंता श्री. राक्षे कार्यालयात दाखल झाले. पोलिस संरक्षणात त्यांनी ग्राहकांशी संवाद साधला. मेन लाईन तुटल्याने सावंतवाडीतील वीज खंडित झाल्याचे त्यांनी सांगितले. इन्सुली येथील सबस्टेशनला आपण गेलो होतो. प्रवाह पुर्ववत करण्यात आल्यानंतर कार्यालयात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी उप अभियंतांवर प्रश्नांचा भडीमार केला. इतर जबाबदार अधिकारी का उपस्थित नव्हते ? फोन का लागत नाहीत असे सवाल केले. यावेळी काहींनी श्री. राक्षे यांची वैद्यकीय तपासणी करावी अशी मागणी केली असता त्यांनी ग्राहकांना अपमानास्पद वागणूक दिली. यानंतर वातावरण अधिकच तापलं. अखेर पोलिसांनी, महावितरणच्या महिला अधिकारी यांनी मध्यस्थी केली. उप अभियंता श्री राक्षे यांनी उपस्थितांची माफी मागत वैद्यकीय तपासणीस होकार दर्शविला.
दरम्यान, महावितरणकडून अशा प्रसंगी जबाबदार अधिकाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावे. टेलिफोन लागत नसल्याने अधिकारी वर्गाचे मोबाईल नंबर फलकावर प्रसिद्ध करावे अशी मागणी केली. तसेच सतत विद्युत पुरवठा खंडित होऊन ग्राहकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, पावसाळा तोंडावर असल्याने असे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.