
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान बँकेच्या प्रधान कार्यालयास महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच गोमय गणेशमुर्ती देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले.
ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक असून ते पाच वर्षं चेअरमन होते. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला यापुर्वी दोन वेळा दिली असून त्यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेऊन बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रवींद्र मडगांवकर, विठ्ठल देसाई, व्हीक्टर डान्टस, समीर सावंत श्रीम. प्रज्ञा ढवण जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.