
वैभववाडी : गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत विद्यामंदिर कोकीसरे नारकरवाडी शाळेची इयत्ता पहिलीतील सान्वी शशिकांत रावराणे हीने राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यात स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यभरातून विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत कु सान्वी हिने १००पैकी ९६ गुण प्राप्त केले. नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत ती राज्यात तिसरी आली. शाळेच्यावतीने तिचं अभिनंदन करण्यात आले.
या परीक्षेत ती यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग कोकरे, शिक्षिका संध्या शेळके,संगिता चव्हाण, शिक्षक संजय कावळे, समीर सरवणकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.