
वेंगुर्ला: वेंगुर्ले शहरातील भाजपचे माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे यांनी आपल्या भाजप शक्ती केंद्र प्रमुख तसेच भाजप सदस्य पदाचा राजीनामा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांच्याकडे २२ एप्रिल रोजी सुपूर्द केला आहे. वेंगुर्ले शहरातील काही भाजप पदाधिकारी व नेत्यांवर त्यांनी आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आपली पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी त्यांच्यासोबत बूथ क्रमांक ४८ चे बुथप्रमुख भगवान कुबल व सर्व सदस्य तसेच बूथ क्रमांक ४७ मधील सर्व सदस्य हे सुद्धा त्यांच्यासोबत भाजप पक्ष सोडत असल्याचे राजीनाम्यात नमूद आहे. तसेच याचबरोबर आपण केलेल्या भाजपचे ३०० सदस्य सुद्धा आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे यावर आता भाजपचे वरीष्ठ काय निर्णय घेतात व नागेश गावडे आपला पुढील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.