
दोडामार्ग : परमे ग्रुप विविध कार्यकारी सहकारी संस्था भेडशीच्या अध्यक्षपदी शैलेश दळवी व उपाध्यक्षपदी रामदास मेस्त्री यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतीच या संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिंदे सेनेच्या पुरस्कृत पॅनलने भाजपा पुरस्कृत पॅनलला चारी मुंड्या चीत करीत विजय मिळविला होता. या संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया गुरुवारी संपन्न झाली. यात अध्यक्षपदी शैलेश दळवी तर उपाध्यक्षपदी रामदास मेस्त्री यांची निवड करण्यात आली.