
सावंतवाडी : कारिवडे पेडवेवाडी येथील हनुमान मंदिरात जय हनुमान मित्रमंडळातर्फे हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन १२ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले आहे. त्यानिमित्त विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. स. ८.३० वा. हनुमान मूर्ती पूजा, अभिषेक, १० वा. सत्यनारायण महापूजा, दु. १२ वा. सत्यनारायण व हनुमान महाआरती, दु. १ वा. महाप्रसाद तसेच तीर्थप्रसाद. रात्रौ ७ ते १० पर्यंत पेडवेवाडीतील ग्रामस्थांची सुश्राव्य भजने होणार आहेत. तसेच रात्रौ १० वा. मातोंड - पेंडूर येथील जय संतोषी दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन जय हनुमान मित्रमंडळ, पेडवेवाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.