श्री देव कुणकेश्वर - आचरा इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबाचा मानसन्मान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 23, 2025 19:34 PM
views 172  views

देवगड : श्री देव कुणकेश्वर आणि आचरा ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे देवस्थान ट्रस्ट वतीने एकमेकांचा मानसन्मान केला. यावेळी दोन्ही देवस्थानचे विश्वस्त- मानकरी व सर्व देवसेवक आदी उपस्थित होते.

श्री देव रामेश्वर संस्थान- कसबा आचरा वतीने श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टला सन्मानचिन्ह देवून मनोमिलनाचा संदेश दिला व एकंदर महाशिवरात्री यात्रा दरम्यान कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ कुणकेश्वर यांसकडुन करण्यात आलेले यात्रोत्सवानिमित नियोजन स्वागत व एकंदर आदरातिथ्य  याबद्दल आभार व्यक्त केले. प्रत्येक देवस्थानवतीने देवसेवेतून सामाजिक कार्य आणि सामाजिक बांधिलकी सोबत धार्मिकता अधिक वृध्दींगत व्हावी या हेतूने सर्वांनी एकत्र होवून हिंदुसंस्कृती मधील दैविकता जपून पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक देवस्थान कमिटीने पुढाकार घ्यावा,असे आवाहन श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले.