
वेंगुर्ला : चिकाटी, जिद्द आणि प्रयत्न यांची सांगड घातल्यास व आवड आणि प्रामाणीकपणे आपल्या क्षेत्रात कार्यरत राहिल्यास यश दूर नाही. अगदी सामान्य कुटुंबात जन्मलेली व्यक्तीही मोठं मोठी स्वप्ने पादाक्रांत करू शकते, हेच अधोरेखित केलंय परुळे गावातील ज्येष्ठ तबला वादक राजाराम परुळेकर यांनी.
परुळेकर यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही १० वी पर्यंत शिक्षण पूर्ण करून नोकरी निमित्त मुंबई येथे ते गेले. मना जोगे काम न मिळाल्याने गावी येऊन उदर निर्वाहासाठी मिल मजुरीची कामे केली. मात्र संगीत कलेची लहानपणापासून आवड असल्याने त्यांनी तबला, परवाज वादनावर भर दिला. गावच्या अन्य भजनी बुवाना संगीत साथही त्यांनी दिली. यादरम्यान कै. वाणराव कारने बुवा यांचेकडे तबला वादनाचा प्राथमिक अभ्यास करून प्रगती केली. संगीत नाटक, ऐतिहासीक नाटक, किर्तन, भजन, डबलबारी सामना, दशावतार या अनेक संगीत गायन प्रकारात त्यांनी संगीत साथ देत वाहवा मिळविली. जिल्हा स्तरीय विविध भजनी बुवांच्या भजन स्पर्धेतही त्यांनी तबला वादन केले. राज्य स्तरीय पुणे येथे झालेल्या बुवा विनोद चव्हाण यांच्या भजनात त्यांनी तबला वादन करून "'व्दितीय क्रमांक" मिळविला.
२००८ साली आकाशवाणी रत्नागिरी, केंद्र येथे सुप्रसिद्ध बुवा मोहन कदम, हिर्लोक कुडाळ,मोहन कदम आणि पार्टी सुगम संगीत लोककला भजन सादरीकरणात तबला वादन येथे प्रसारण झाले. सिंधु भजन रत्न बुवा श्री भालचंद्र केळुसकर यांनी दापोली- रत्नागिरी येथे भजन डबलबारी सामना, तबला वादन करून वाहवा संपादन केली. ठाकरवाडी म्युझियम पिंगुळी, कळसुत्री बाहुल्यांचा नाट्य प्रयोग, गणपत मसगे निर्मित इंदौर मध्य प्रदेश अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवात पखवाज वादन केले.
नव तरुण भजनी बुवा भजन स्पर्धेत राजाराम परुळेकर याना तबला वादनासाठी मागणी असते. त्याना बऱ्याच भजन स्पर्धेत तबला वादन पारितोषीक, पुरस्कार मिळालेले आहेत. अशा या सर्वासामन्य कुटुंबात जन्मलेल्या मात्र संगीत क्षेत्रात स्वतः सह गावचं नवलोकिक करणाऱ्या कलाकाराचं ग्रामवासियांनातून कौतुक होत आहे.