
सिंधुदुर्गनगरी : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्याची पूर्तता होत नसल्याने आज सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने धन्य आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष प्रा. डी.जे .शितोळे, एस्.डी गावकर, पी.बी वनवे, ए.पी चव्हाण एन एम मासी पी बी किल्लेदार के आर बागेवाडी एन के साळवी ए एस मांगले एन के प्रभूए.जी. गुरसाळे ए.ए.कांबळे पी.ए. मालवणकर एस एस गुरव आदीप्राध्यापक सहभागी झाले होते.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यावर निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक नाराज आहेत शिक्षण मंत्र्यांनी पदभार घेतल्यापासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकदाही स्वतंत्र बैठक घेतली नाही व समस्यांचे निराकरण केले नाही. असा यावेळी आरोप करण्यात आला.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे त्रस्त झाला आहे. आयटी शिक्षकांच्या समायोजनाचा शासनादेश अवश्यता अनुदान प्राप्त शिक्षकांना वाढीव टप्पा सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना शाळा संहिता नुसार वर्गातील विद्यार्थी संख्येचे निकष पाहणे इत्यादी मान्य मागण्याची आदेश निघाले नाहीत. त्याबाबत अनेक वेळा निवेदने देऊनही अद्याप चर्चाही केली नाही. त्यामुळे शिक्षकांच्या मनात असंतोष निर्माण झाला असल्याने पुन्हा महासंघाने आंदोलनाची हत्यार उगारले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.