चर्मकार उन्नती मंडळाचे काम आदर्शवत : वैभव नाईक

संत रविदास भवन उदघाटन सोहळा
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 17, 2025 18:19 PM
views 66  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाने उभारलेले संत रविदास भवन, सर्व समाजाचा समावेश करून भरविलेल्या विविध स्पर्धा,विविध उपक्रम हे सर्वच समाजाला आदर्शवत असे काम असून चर्मकार समाजाच्या या एकजुटीचे हे फलित आहे असे गौरवोद्गार माजी आमदार वैभव नाईक यांनी काढले.

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवन च्या पहिल्या टप्प्याचा उदघाटन समारंभ, मंडळाचा वर्धापन दिन, संत रविदास समाजभूषण पुरस्कार, विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ व समाजातील गुणवंतांचा सत्कार समारंभ हुमरमळा ता.कुडाळ येथे पार पडला.

यावेळी स्थानिक विकास निधीतून भवनासाठी निधी देणारे माजी आमदार वैभव नाईक हे उदघाटक म्हणून उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हुमरमळा सरपंच समीर पालव, उपसरपंच संचिता पालव, माजी उपसभापती जयभारत पालव, माजी पं.स.सदस्या सुप्रिया वालावलकर, माजी सरपंच महानंदा बांदेकर, मंडळाचे मार्गदर्शक अनिल निरवडेकर, विजय चव्हाण, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, कोषाध्यक्ष नामदेव चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, दीपक समजीस्कर, उत्तम चव्हाण, सहसचिव बाबुराव चव्हाण, बाळकृष्ण नांदोसकर, सुभाष बांबूळकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण, नंदन वेंगुर्लेकर, सल्लागार शरद जाधव, प्रदीप पवार, सुधीर जाधव, पी.बी.चव्हाण, तालुकाध्यक्ष मनोहर सरमळकर, गणेश म्हापणकर, महेंद्र चव्हाण, सहदेव शिरोडकर, रमेश चव्हाण, अनंत नेवरेकर, तालुका सचिव गुंडू चव्हाण, विठ्ठल चव्हाण, महेश चव्हाण, संभाजी कोरे, समिती प्रमुख श्रीराम चव्हाण, प्रकाश वाघेरकर, प्रशांत चव्हाण, सुरेश पवार, कावेरी चव्हाण, रविकिशोर चव्हाण, लवेंद्र किंजवडेकर, अनिल चव्हाण, महिला सदस्या प्रिया आजगावकर, मयुरी चव्हाण, शामल चव्हाण, उर्मिला वेंगुर्लेकर, कार्यकारिणी सदस्य राजीव कुडाळकर, गणेश चव्हाण, प्रसाद पाताडे, आनंद जाधव, नारायण पार्सेकर ,प्रवक्ता के.टी.चव्हाण, सुनील जाधव, स्वीकृत सदस्य मंगेश आरेकर, दयानंद चव्हाण, संघटक गुरुप्रसाद चव्हाण, देवेंद्र देवरुखकर, समिती सहप्रमुख राजन वालावलकर, रामदास चव्हाण, नितीन बांबर्डेकर, उदय शिरोडकर, नितीन पवार, ऋषिकेश जाधव, सुनिल पाताडे, संतोष हिवाळेकर, आकांक्षा म्हापणकर, सुप्रिया चव्हाण, विनायक जाधव, युवा तालुकाध्यक्ष महेंद्र देवरुखकर, मनोहर पाताडे, रोहित वेंगुर्लेकर, आनंद चव्हाण, कामाचे ठेकेदार रुपेश आमडोसकर, हुमरमळेकर वाडी सदस्य बापू हुमरमळेकर, वामन हुमरमळेकर, गणपत हुमरमळेकर, तुळशीदास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हासरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी पहिल्या टप्प्यातील कामाचा अनुभव व समाजबांधव यांचे सहकार्य याचा उल्लेख केला. क्रांतीज्योती महिला मंडळ ओरोस कसाल यांनी ईशस्तवन व स्वागतपदय सादर केले. समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना संत रविदास समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये कुडाळ-के.टी. चव्हाण, मालवण-विजय चौकेकर, सावंतवाडी-रविकिशोर चव्हाण, वेंगुर्ला-लक्ष्मी वेंगुर्लेकर, कणकवली-प्रभाकर चव्हाण, देवगड-संतोष चव्हाण,वैभववाडी- ,दोडामार्ग  यांचा समावेश  होता.

यावेळी जिल्हास्तरीय निबंध, कविता, वक्तृत्व व हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.समाजातील सेवानिवृत्त, पदोन्नती व विशेष कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरवही यावेळी करण्यात आला. तसेच भवन इमारतीच्या शुभारंभानिमित्त "रविक्रांती" ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यरत असणाऱ्या मनोहर पाताडे, सुनील पाताडे, नितीन पाताडे, किरण पाताडे, समीर धामापूरकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सुप्रिया वालावलकर, समीर पालव, अनिल निरवडेकर, विजय चव्हाण यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश आरेकर, प्रशांत चव्हाण, विठ्ठल चव्हाण यांनी तर आभार आनंद जाधव यांनी मानले.