
दोडामार्ग : तिलारी धरणाच्या जलाशयाला लागुन असलेल्या शिरंगे गावातील काळ्या दगडाचे गौण खनिज उत्खनन त्वरित बंद करण्याची मागणी करून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर खानयाळे गावचे माजी सरपंच लक्ष्मण गावडे व ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ६ मार्च पासून शिरंगे गावच्या हद्दीवर साखळी उपोषण सूरू केले आहे याबाबत लक्ष्मण गवस यांसह १४८ जणांचे स्वाक्षरी असलेलं लेखी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. १८ फेब्रुवारी ला काळे दगड उत्खनन बंद करण्याचा ग्रामसभा ठरावं सुद्धा ग्रामसभेत घेण्यात आला होता. याबाबत कार्यवाही न झाल्याने उपोषण सूरू आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही खालील सह्या करणारे ग्रामस्थ हे गांव मौजे खानयाळे येथिल रहिवाशी असुन, शिरंगे या जुन्या गावी तिलारी धरणाला लागुन काळया दगडाचे गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात रातरोजपणे चालू आहे. ते तात्काळ बंद करणेबाबत निवेदन दिलेले होते. सदर निवेदनाचे अनुषगाने २१ फेब्रुवारी ला पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे दोडामार्ग यांनी पोलिस पाटील खानयाळे यांचेमार्फत तोंडी बोलावून आमचे म्हणणे ऐकूण घेतले. आम्ही दोन वेळा निवेदन दिलीत मात्र सदरचे गौण खनिजचे उत्खनन अध्याप बंद करण्यात आलेले नाही.धरण बुडीत क्षेत्रालगत असलेल्या सदर दगड खाण उत्खनन क्षेत्राची त्रयस्थ अधिकारी, प्रसार माध्यम प्रतिनिधी व आमचे प्रतिनिधी यांचे समक्ष पाहणी व मोजणी करुन परवाना दिलेले भूमापन क्रमांक व सध्या उत्खनन चालू असलेले भूमापन क्रमांक यांची खातर जमा करावी. मात्र ती अद्याप न झाल्याने आम्ही खानयाळे गावचे ग्रामस्थ आज पासून मौजे शिरंगे गावच्या सिमेलगत खानयाळे गावाच्या हददीत साखळी उपोषणास बसणारसूरु केले आहे. मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनावर
सुहास शेटये, आपा शेटये, नामदेव शेटये, संध्या शेटये, सुधा शेटये, सोमनाथ परमेकर, सुरेश शेटये, प्रमिला शेटये, प्रकाश शेटये,प्रतिभा शेटये , सीताराम शेटये , देवानंद शेटये, नारायण गोविंद नाईक, निलम ब नाईक, नागराज नारायन नाईक, गोविंद नारायन नाईक, चंद्रकांत गणेश शेटये, सौ. रोहीणी चंद्रकांत शेट्ये, प्रमोद तुकाराम बोरखे, ज्योत्स्ना प्रमोद शेटये, विष्णु शेटये, लक्ष्मी विष्नु शेटये, नारायण में नाईक, गोविंद नाईक, सौ. बीना नाईक, उमेश रविंद्र नाईक, समीर नाईक, आपा (अनंत) नाईक, सिता रामा नाईक, रविंद्र विष्णु नाईक, सौ इंद्रायणी रविंद्र नाईक, विष्णु मौजी नाईक, यशवंत नाईक, श्रिपाद नाईक, लक्ष्मण मतेजी नाईक, आष्णा दत्ताराम नाईक, राधीका कृष्णा नाईक, विष्णु नाईक, सौ० द्वारका नाईक, विनायक विष्णु नाईक, संगिता विनायक नाईक यांसह १४८ जणांच्या सह्या आहेत.
१८ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या ग्रामसभेत घेण्यात आला ठराव
ठराव क्र. ७ मध्ये गाव मौजे शिरंगे या गावी चालू असलेले काळ्या दगडाचे गौण खनिज उत्खनन बंद करण्याबाबत अर्ज प्राप्त आहे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर काळा दगड उत्खननसाठी ग्रामपंचायत कडून नाहरकत दाखला देण्यात आलेला नाही याबाबत माहिती देण्यात आली. सदर काळा दगड उत्खननमुळे गावातील लोकांच्या घरांना हानी पोहचत आहे. तसेच भविष्यात यामुळे लोकांच्या जीवास धोका पोहचू शकतो. सदर काळा दगड उत्खननमुळे गावातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. तसेच यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. निसर्गास आणि मानवी वस्तीस हानिकारक असणारे सदर काळेदगड उत्खनन बंद करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा असे सुचविण्यात आले आहे. या ठरवाचे सूचक माजी सरपंच लक्ष्मण गावडे असून अनुमोदक सुहास शेट्ये आहेत. हा ठराव सर्वानुमते मंजूर आहे.