
सिंधुदुर्ग : राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाअन्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग हेमंत भ. गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी "बेटी बचाओ, बेटी पढाओ" या उपक्रमांतर्गत संपूर्ण राज्यभरात दि. २२.०१.२०२५ ते दि. ०८.०३.२०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले आहे. त्या अनुषंगाने दि. ०५.०३.२०२५ रोजी पंचायत समिती हॉल कुडाळ येथे कार्यक्रम अयोजित करणेत आले. श्रीमती संपूर्णा कारंडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, ॲड. रुचा लोखंडे, सहाय्यक लोक अभिरक्षक, लोक अभिरक्षक कार्यालय सिंधुदुर्ग, मृणाल कार्लेकर सहाय्यक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती कुडाळ, मिलन कांबळे, संरक्षण अधिकारी कुडाळ तसेच श्रीमती छाया घाडीगावकर, श्रीमती शर्मिला वसावे पर्यवेक्षिका कुडाळ हे उपस्थित होते.
संपूर्णा कारंडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी उपस्थितांना महिला सक्षमीकरण व सबलीकरण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांना समाजात वावरताना कोणती काळजी घ्यावी, आपणच आपली सुरक्षा करावी असे आवाहन केले. ॲड. रुचा लोखंडे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ कायदा २०१३ (POSH Act) याबाबत माहिती दिली. मृणाल कार्लेकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी पंचायत समिती कार्यालय येथे POSH Act अंतर्गत कार्यरत असलेल्या समितीची माहिती दिली. तसेच मिलन कांबळे, संरक्षण अधिकारी कुडाळ महिलांना बेटी बचाओ, बेटी पढाओ याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविका व आशा सेविका बहुसंख्येने उपस्थित होत्या. श्वेता सांवंत लिपिक यांनी सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले. अक्षय कानविंदे, सहाय्यक अधिकारी अभय केंद्र कुडाळ यांनी सर्वांचे आभार मानले.