राजे प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय गौरव सोहळा

छ.उदयनराजेंकडून जिल्ह्यातील कार्यकारिणीचं कौतुक
Edited by: विनायक गांवस
Published on: February 28, 2025 19:04 PM
views 177  views

सावंतवाडी : छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आदर्श पुरस्कार देऊन करण्यात आला. सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे हा सोहळा संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती उदयनराजे भोंसलेंच्या मार्गदर्शनाखाली राजे प्रतिष्ठान कामगार सेना उल्लेखनीय कार्य करत असल्याचे प्रतिपादन राज्य उपाध्यक्ष गोल्डमॅन बशीरभाई कुरेशी यांनी केले. 

सावंतवाडी भंडारी भवन येथे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आदर्श पुरस्कार देऊन करण्यात आला. यामध्ये शिक्षिका स्वाती पाटील, भारती,ज्ञानेश्वर ठाकरे,अपर्णा थोरात, चंद्रकांत सावंत, रमाकांत गावडे, सुखदा जांबळे, दयानंद मठपती, संतोषी बांगर, प्रतिभा बारी, पत्रकार उमेश सावंत, प्रशांत मोरजकर, विनायक गांवस, उद्योजक जीवा राऊळ,सुधीर आडिवरेकर,  कुणाल वरसकर, मंगेश माणगावकर, संदीप चांदेलकर, पूजा सोनसुरकर, सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर, रवी जाधव, नारायण उर्फ बाळा जाधव, जयराम आजगांवकर,  गजेंद्र कोठावळे तसेच विवध क्षेत्रातील मान्यवरांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच राजे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला, निबंध, वेशभूषा, गणेश दर्शन स्पर्धांच्या बक्षीसांच वितरण यावेळी करण्यात आले. तसेच प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर राज्य कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके, उपाध्यक्ष गोल्डमॅन बशीरभाई कुरेशी, जितेंद्र खानविलकर, गोरख बोडके, सचिन जुवाटकर, अक्षय म्हात्रे, महेश परब, अमोल डांगे, सुभाष गजरे, जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना राज्य सरचिटणीस चंद्रकांत धडके म्हणाले, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. राजेंसोबत आम्ही काम करत आहोत हे आमचं भाग्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चांगल काम सुरू आहे याचा आनंद अधिक आहे असं मत व्यक्त केले. यावेळी गायक अक्षय म्हात्रे यांनी उदयनराजेंवरील सुप्रसिद्ध गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सचिव रामचंद्र कुडाळकर, ज्ञानेश्वर पारधी, कल्याण कदम, शिवा गावडे, मंगेश माणगावकर, पूजा सोनसुरकर, पुजा गावडे, नारायण सावंत, सुधीर धुमे, संजय गावडे, महेंद्र चव्हाण, सेजल गावडे, मिलिंद डोंगरे, संचिता गावडे, अनघा रांगणेकर, सेजल पेडणेकर, केशव जाधव, अमर पाटील, उमेश तळवणेकर, संदीप चांदरकर, सचिन गावडे, श्याम सावंत, अंकिता सावंत, सुभाष गावडे, मकरंद मेस्त्री आदींसह राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रामचंद्र कुडाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी तर आभार कल्याण कदम यांनी मानले.