माजी विद्यार्थ्यांकडून वर्ग खोलीचे नूतनीकरण

'ही दोस्ती तुटायची नाय' ग्रुपचे आदर्शवत कार्य
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 26, 2025 13:18 PM
views 606  views

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली या प्रशालेत शिक्षण घेऊन आपापल्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या दहावी 1988-89 व बारावी 1990-91 च्या माजी विद्यार्थ्यांचा ही दोस्ती तुटायची नाय असा ग्रुप तयार झाला गेली. 10/12 वर्षे गेट-टुगेदर च्या माध्यमातून स्नेह मेळावा विनाखंड आयोजित केला जातो. या ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. 3 ते 4 माजी विद्यार्थ्यांनी सुरुवात झालेला हा ग्रुप 32 माजी विद्यार्थ्यांनी जोडला गेला.

एखाद्या ग्रुप सदस्याच्या कुटुंबातील व्यक्तीला काही अडचण निर्माण झाल्यास ग्रुप मध्ये चर्चा करून मदतही केली जाते. सामाजिक भावनेतून त्याचप्रमाणे कुटुंबातील व्यक्ती समजून जी जी मदत करता येईल ते सर्व केले जाते दरवर्षी होणारे स्नेह मिळावे सुरुवातीला मुंबई येथे होत होते. परंतु गावाकडील सदस्यांना (सर्व) त्या ठिकाणी जाणे शक्य नसल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरे होऊ लागले. यामधून चर्चा होऊन आपण ज्या विद्यालयात शिक्षण घेतले,आपल्याला दिशा दिली,समाजात वावरण्याचे जे संस्कार दिले त्याचे आपण काही देणे लागतो या भावनेने आपण प्रशालेसाठी काही मदत करू शकतो का? यावर विचार विनिमय होऊन सर्वानुमते ठरविण्यात आले की, एखाद्या वर्ग खोलीचे नूतनीकरण करून द्यावे. त्यानंतर खर्चाबाबतचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले रक्कमही जमा झाली. परंतु काम करता करता खर्च वाढत गेला. यावेळी लागणारी उर्वरित रक्कमही जमा करून वर्ग खोलीचे नूतनीकरण रंगरंगोटी टाइल्स तसेच इतर सर्व कामे करून वर्ग खोली सुसज्ज करण्यात आली. 

यासाठी विद्यालयाच्या संचालक मंडळ, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ यांनी विनंती केली की या नूतनीकरण केलेल्या वर्गखोलीचे उद्घाटन आपल्या सर्वांच्या शुभहस्ते व्हावे असा आग्रह धरला. तसेच सर्व माजी विद्यार्थी यांचा सत्कार करणारा असल्यामुळे 'स्नेह मेळाव्या' दिवशी या कार्यक्रमासाठी वेळ द्यावा अचानक आलेल्या निमंत्रणामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला कारण हे काम करण्यामागे कोणताही स्वार्थ भाव किंवा उपकाराची भावना नव्हती याबाबत सर्व माजी विद्यार्थ्यांनी विनंती केली की आपण कोणत्याही व्यक्तीच्या हस्ते या वर्ग खोलीचे उद्घाटन करून घ्या. परंतु प्रशालेने हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या शुभहस्ते करायचा असल्यामुळे 'स्नेह मेळाव्या' दिवशी या कार्यक्रमाला आपला थोडा वेळ द्यावा. 

'स्नेहमेळाव्या'च्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रशाळे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित झाल्यावर प्रशाळेच्या गेटवर सर्वांचे औक्षण करून लेझीम वाद्यासह मिरवणुकीसह कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन गेले. संपूर्ण प्रशाळेच्या आवार स्वागतासाठी रांगोळीने सजविला होता. माजी विद्यार्थ्यांना आपण प्रशाळेत अजून शिक्षण घेत आहोत याचा भास व्हावा म्हणून सर्वांना वर्गखोलीत बसविण्यात आले. यावेळी प्रशाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थी यांची ओळख करून देण्यात आली. यावेळी शिक्षक वर्गातून सांगितले की आपण भावी पिढीला घालून दिलेले आदर्शाबद्दल मार्गदर्शन करावे.

त्यानंतर नूतनीकरण केलेल्या वर्ग खोलीचे उद्घाटन या प्रशालेचे माजी पर्यवेक्षक तसेच प्रशालेच्या शालेय समितीचे पदाधिकारी माननीय आनंद वारंगसर यांच्या शुभहस्ते माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थिनी श्रीम.शीलांगी धुरी शिक्षिका मुंबई, श्री संतोष वारंग मुख्याध्यापक लांजा यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मार्गदर्शन केले. आपणही मोठे झाल्यावर नोकरी व्यवसायात स्थावर झाल्यावर प्रशाळेसाठी जी काही मदत करता येईल ती करावी. आपण या प्रशाळेचे देणे लागतो ज्या प्रशालेने आपणास घडविले चांगले संस्कार दिले आपणास नाव व ओळख समाजात निर्माण करून दिली, या भावनेने आपण जे शक्य आहे ते करावे यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले. तसेच यापुढेही जे शक्य होईल ते करण्याचे आश्वासन दिले. प्रशाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. यावेळी ही दोस्ती तुटायची नाय या ग्रुपचे सर्व माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद,शालेय समितीचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.

यावेळी शिलांगी भिसे, मीना तावडे, सुवर्णा सावंत, लता पवार, सीमा मेस्त्री, कृष्णा भिरमोळे, भाई भिंगारे, धर्मा सावंत,लवू महाडेश्वर, प्रवीण हिर्लेकर, सुधीर चव्हाण, सत्यवान वारंग, लीना नाईक, दीपक वारंग, संतोष वारंग, कल्पना वारंग,गुरु जाधव, राजेंद्र सडवेलकर, संतोष सावंत आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.