
सावंतवाडी : मळगाव ते नेमळे दरम्यान महामार्गांवरून दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. या महामार्गांवर लवकरात लवकर काँक्रे्टीकरण करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी वाहन चालकाकडून करण्यात येत आहे.
झराप पत्रादेवी हा राष्ट्रीय महामार्ग दोन्ही बाजूनी पूर्ण पणे उखडून गेल्यामुळे महामार्ग वाहन चालकासाठी धोकादायक बनला होता. या महामार्गाच्या दोन्ही बाजूने सिमेंट चा रस्ता बनविण्याचे काम चालू असल्यामुळे खराब झालेले डांबरिकरण मशीनच्या सहाय्याने खरवडून काढण्यात आले आहे. या खरवडून काढण्यात आलेल्या मळगाव ते नेमळे दरम्यान महामार्गांवरून दुचाकी वाहन चालक वाहने चालवीत असताना वाहने स्लीप होऊन अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. या महामार्गांवर लवकरात लवकर काँक्रे्टीकरण करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी वाहन चालकाकडून करण्यात येत आहे.