प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण टप्पा 2चा हप्ता वितरण

Edited by: विनायक गांवस
Published on: February 21, 2025 16:49 PM
views 248  views

सावंतवाडी : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांना मंजूरी आदेश व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सैनिक वसतीगृह सभागृहात दु ३ वा आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते हे वितरण होणार आहे.


प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 या वर्षात महाराष्ट्र राज्य शासनाकडून 20 लाख मंजूरी व 10 लाख लाभार्थ्यांना अनुदानाचा प्रथम हप्ता वितरणाचा कार्यक्रम केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुणे येथे शनिवारी सायंकाळी आयोजित केला आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत निहाय मंजूर लाभार्थी यांचे उपस्थितीत व तालुकास्तरावर आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते माजी सैनिक वसतीगृह हॉल, सावंतवाडी (शिवउद्यानाच्या मागे) दुपारी 3 वा. मंजूर लाभार्थ्यांच्या उपस्थितीत वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा राज्यस्तरीय कार्यक्रम व्हीसी द्वारे सायंकाळी 4  वाजता तर तालुकास्तरीय कार्यक्रम दुपारी 3 वाजता होणार असल्याने सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गट विकास अधिकारी व्ही एम नाईक यांनी केले आहे.