
सावंतवाडी : ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघ सावंतवाडी यांच्यावतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती.
ऑटो रिक्षा सेना, चालक-मालक संघ सावंतवाडी यांच्यावतीने शिवजयंती सोहळ्यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या २७ व्या वर्षानिमित्त मान्यवरांचा व रिक्षाचालकांचा सत्कार संघटनेच्यावतीने करण्यात आला. यामध्ये समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सचिन पोलानी, पराग मातोंडकर, कांता कोड्याळ, सदानंद पडते, अभिनेते गजेंद्र कोठावळे, गायिका निधी जोशी, व्यापारी प्रसाद मुंज, सचिन तळेकर, महेश तळवणेकर, सागर गोसावी, रघुनाथ कोरगावकर, नागेश ओरोसकर, किशोर जाधव, अशोक कांबळे, रूपेश हिराप, संदीप टोपले आदी मान्यवरांचा, रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री आम. दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोंसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयकुमार काळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, माजी प्राचार्य व्ही.बी.नाईक, डॉ. बलवंत सावंत, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, ह्यूमन राईट फॉर प्रोटेक्शन कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ सहसचिव सुधीर पराडकरयांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवजयंती निमित्त श्री देव नारायण मंदिर येथे सकाळी सत्यनारायण पूजा, महाआरती, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी गजानन प्रासादिक भजन मंडळ कोलगाव बुवा सुरेश राऊळ यांचे सुश्राव्य भजन पार पडले. रात्री श्री देव कलेश्वर सातेरी दशावतार नाट्यमंडळ नेरुर - राईवाडी यांचा "हस्तिकेश्वर हनुमान" हा नाट्यप्रयोग रसिकांच्या उदंड प्रतिसाद संपन्न झाला. यावेळी ऑटो रिक्षा सेना अध्यक्ष धर्मेंद्र सावंत, उपाध्यक्ष महादेव बामणे, सचिव सदानंद धरणे, खजिनदार जयवंत टंगसाळी तसेच अॅटो रिक्षा चालक मालक संघ सावंतवाडीचे पदाधिकारी आणि रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.