
दोडामार्ग : मोर्ले बागवाडीतील सिंधूरत्न योजनेअंतर्गत आमदार दीपक केसरकर यांनी बंधारा मंजूर केला. त्याचा भूमीपूजन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी तालुका प्रमुक शिवसेना गणेशप्रसाद गवस यांनी नारळ वाढून भूमिपूजन केले.
यावेळी तालुका संघटक गोपाळ गवस, युवा सेना प्रमुख तालुका भगवान गवस, विभाग प्रमुख संजय गवस, रामदास मेस्त्री, विभाग प्रमुख कुडासे सातेरी मंदिर विश्वस्त रमाकांत गवस, प्रताप गवस, लुमा गवस, महादेव गवस, माजी सरपंच गोविंद गवस, उपसरपंच संतोष मोर्ये, सत्यवान बेर्डे, सदस्य अभय मणेरीकर, पुरोहित माजी सरपंच मणेरीकर, सदस्या मणेरीकर, तसेच मोर्ले गावातील महिला उपस्थित होत्या. यावेळी आमदार दीपक केसरकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले गेले.