सावंतवाडी : मूळ सांगेली-सावंतवाडी येथील रहिवासी आणि सध्या माणगाव-कुडाळ येथे राहणारे लाकूड व्यावसायिक राजीव शशीमोहन खोत (६७) यांचे शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगी, दोन भाऊ, तीन बहिणी, पुतणे, पुतणी, भाचे असा मोठा परिवार आहे. नम्रता खोत यांचे ते वडील तर बाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील खोत तसेच निवृत्त पोलीस अधिकारी श्रीकांत खोत यांचे ते भाऊ होत.