रस्त्याचं काम सुरु झाल्याने उपोषण स्थगित

Edited by: विनायक गांवस
Published on: January 23, 2025 20:56 PM
views 91  views

सावंतवाडी :  बांदा शेर्ले तेरेखोल नदीवर जीवन प्राधिकरण खात्याच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला  होता. मात्र रस्त्याच्या  डांबरीकरणाचे  काम मंगळवारपासून सुरू झाल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ पप्पू खोबरेकर व राजेश चव्हाण या ग्रामस्थांनी दिली आहे.   

बांदा शेर्ले या  गावांना जोडणाऱ्या तेरेखोल नदीवर पूल व्हावा अशी अनेक वर्षाची मागणी होती. मात्र, जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे. पुलाला जोडणारा दोन्ही बाजूचा रस्ता खराब झाल्याने रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर महेश उर्फ पप्पू खोबरेकर व ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार नुकतीच ग्रामस्थ पत्रकार मोहन जाधव यांनी जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता योगेश नगाप्पा, आय एस पी कंपनीचे अमेय शंभू शेठ यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधले होते.

त्यानुसार कंत्राटर कंपनीने  मंगळवारी या डांबरी करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष डांबरीकरणाचे काम बुधवारपासून सुरू होणार असल्याने रस्ता तूर्त वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी सहकार्य करावे असं कंत्राटदार प्रसाद सावळ याने आवाहन केले आहे. त्यामुळे नियोजित उपोषण स्थगित करण्यात आले आहे.