दोडामार्ग : तालुक्यातील गिरोडे येथील सदाशिव मनोहर गवस यांच्या शेत विहिरीत गुरुवारी सकाळी गवारेडा पडल्याची घटना घडली. याबाबत वनविभागाला कल्पना दिल्या नंतर विहिरीतील गव्याला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले.
याबत अधिक माहिती अशी की गिरोडे येथील सदाशीव गवस यांच्या काजू बागेतील शेत विहिरीत गुरुवारी गवा रेडा पडला. सदाशिव गवस यांना काजू बागेत गेले असता निदर्शनास आला. यावेळी त्यांनी दोडामार्ग वनविभागाला यांची कल्पना दिली. यावेळी दुपारी दोडामार्ग वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन जेसीबीच्या सहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले. ही मोहीम वक्षेत्रपाल वैशाली मंडल यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वी करण्यात आली. यावेळी वनविभागाचे वनपाल संग्राम जितकर, वनरक्षक उमेश राणे तसेच विश्राम कुबल ग्रामस्थ उपस्थित होते.