
वैभववाडी : क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ मुंबई यांचा यावर्षीचा उद्योजक पुरस्कार वैभववाडी येथील प्रसिद्ध बिल्डर व महाकाली कन्स्ट्रक्शनचे मालक विजय तावडे यांना प्राप्त झाला. खा.नारायण राणेंच्या हस्ते मुंबईत या पुरस्काराचे वितरण झाले.
क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचा स्नेहमेळावा संपन्न झाला. यानिमित्ताने मराठा समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्री तावडे यांची उद्योजक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. श्री.तावडे यांचं बांधकाम क्षेत्रात नाव प्रसिद्ध आहे. महाकाली कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून मुंबईसह वैभववाडीतही त्यांनी अनेक गृहप्रकल्प उभारले आहेत. वैभववाडी पहीला सात मजली गृहप्रकल्प त्यांनी साकारला. बांधकाम क्षेत्रातील या कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नारायण राणेंच्या हस्ते हा पुरस्कार श्री.तावडे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.