सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हातील माजी सैनिक यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसेच पोलीस दलाकडून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास तत्पर मदत कायदेशिर मार्गाने देण्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये 25 माजी सैनिक व कुंटुबिय उपस्थीत होते. माजी सैनिकांनी उपस्थीत केलेल्या त्यांच्या अडचणींचे निरसन करण्यात आले. प्रलंबित तक्रारीबाबत संबंधीत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना तक्रारींचे निरसन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्याबाबत माजी सैनिकांनी समाधान व्यक्त करुन पोलीस दलाचे आभार मानले.
शासन निर्णय दिनांक 04 ऑक्टोबर 2007 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सैनिक/माजी सैनिक यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय समिती गठीत करण्यात आलेली असून सदर समितीची दरमहा बैठका आयोजित केली जाते. सैन्य दिनाचे औचित्य साधून माजी सैनिकांच्या कुंटुबियांना भेटून त्यांचे समाधान केले तसेच यापुढे ही जिल्हयातील सैनिकांच्या कुटुंबावरील अन्याय/ अत्याचाराच्या घटनांची माहिती सदर समितीकडून जिल्हयाच्या मासिक पोलीस अहवालामध्ये नमूद करण्यात येईल व त्याचे निरसन करण्यात येईल अशी ग्वाही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.