गोवंश वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात

वैभववाडी पोलीसांची कारवाई
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 15, 2025 14:43 PM
views 209  views

वैभववाडी : गोवंश वाहतूक करणारा कोल्हापूर येथील टेम्पो वैभववाडी पोलीसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई आज सकाळी १०.३०च्या दरम्यान भुईबावडा घाटात ही कारवाई केली आहे.

टेम्पोसह चार जनावरे पोलीसांनी ताब्यात घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी पोलीसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.