कोल्हापूरच्या 'कलम ३७५' द्वितीय तर 'ऑलमोस्ट डेड'ला तृतीय क्रमांक
वेंगुर्ले : एकापेक्षा एक सरस व दर्जेदार अशा एकूण १७ एकांकिकांनी चुरशीच्या ठरलेल्या वेंगुर्लातील कलावलय आयोजित प्रा. शशिकांत परनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धेच्या विजेतेपदावर मुंबईतील अंग्रेश्वर विऐटर्सने सादर केलेल्या 'चारू' या एकांकिकेने आपले नाव कोरले. रोख पारितोषिक व फिरता चषक, कायमस्वरूपी चषक व प्रमाणपत्र देऊन विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कोल्हापूरच्या परिवर्तन कला फाऊंडेशनच्या कलम ३७५' या एकांकिकेने द्वितीय तर कोल्हापूर येथीलच गायन समाज देवल क्लबच्या ऑलमोस्ट डेड या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावत्ता.
येथील नाटककार मधुसुदन कालेकर नाट्यगृहात गेले तीन दिवस चाललेल्या या एकांकिका स्पर्धेत तब्बल १७ संघांनी सहभाग दर्शविला होता. सातारा येथील ज्येष्ठ नाट्धकर्मी तुषार भद्रे व सुनील गुरव यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. परीक्षण या नात्याने बोलताना तुषार भद्रे म्हणाले की, अभिनेत्याने नेहमी तयार राहिले पाहिजे आपला आवाज शेवटच्या रसिकांपर्यंत न अडखळता पोहोचविणे हे त्याची सर्वात मोठी जबाबदारी असते. रंगमंचीय अविष्कारात त्यालाच सर्वोच्च कामगिरी करावी लागते, प्रकाश योजना, नेपथ्य, पार्श्वसंगीत या सपोर्ट सिस्टीम आहेत. जेवढे नेपथ्य लावले त्याचा वापर व्हावा लागतो, किंमहून विषयाचे गांभीर्य ओळखून रंगमंचकीय सजावट केल्यास संहितेला बळ मिळते अतिधाई किंवा अतिअभिनय सोबतचा कलाकार व रसिकांचा रसमंग करू शकतो. त्यामुळे रंगमंचावर आल्यावर कलाकाराने नेहमी सर्व गोष्टीचे मान ठेवणे अत्यावश्यक आहे. असे ते म्हणाले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे
सांघिक प्रथम चारू (अंग्रेज्वर विएटर्स मुंबई), द्वितीय कलम ३७५' (परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूर), तृतीय 'ऑलमोस्ट डेड' (गायन देवल समाज क्लब कोल्हापूर), उत्तेजनार्थ प्रथम पूर्णविराम (कलासक्त मुंबई) उत्तेजनार्थ द्वितीय 'निर्धार' (मुख्तलिख थिएटर्स कोल्हापूर).
उत्कृष्ट दिग्दर्शन: प्रथम सागर जेठवा (चारू अंग्रेश्वर विएटर्स मुंचई), द्वितीय वैष्णवी पोतदार (कलम ३७५' परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूर), तृतीय- प्रमोद पुजारी ('ऑलमोस्ट डेड' गायन देवल समाज क्लब कोल्हापूर). उत्कृष्ट पुरुष अभिनय प्रथम विशाल दुराके ('ओळख' दृष्टी पुणे). द्वितीय- प्रमोद पुजारी (ऑलमोस्ट डेड' गायन देवल समाज क्लब कोल्हापूर), तृतीय प्रथमेश चुबे ('चारू' अंग्रेश्वर थिएटर्स मुंबई), उत्तेजनार्थ प्रथम साहील देसाई (ऑफलाईन थी. व्ही. थिएटर्स कुडाळ), उत्तेजनार्थ द्वितीय- दीपक जानकर ('मशाल' समर्थ कलाविष्कार देवगड), उत्तेजनार्थ तृतीय योगेश कदम (इंटरोगेशन' क्रिएटिव्ह कार्टी)
उत्कृष्ट स्त्री अभिनय प्रथम जान्हवी जाधव (चारू' अंग्रेश्वर थिएटर्स मुंबई), द्वितीय सानिका कुंटे (ऑफलाईन' निर्मिती बिएटर कुडाळ), तृतीय- प्राची कात्रे ('ओळख' दृष्टी पुर्णे), उत्तेजनार्थ प्रथम कांचन परुळेकर (विठाई नाटकवेडे रत्नागिरी), उत्तेजनार्थ द्वितीय मंगल डिसोझा ('विवर' कलारंग मालवण देवगड) उत्तेजनार्थ तृतीय वर्षा जाधव ('चोली के पिछे क्या है' थिएटरवाले मुंबई)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य: रमा कुलकर्णी, ऋतुराज कुलकर्णी (ऑलमोस्ट डेड), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : ओमकार वर्ण (कलम ३७५), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना: चेतन पडवळ (चारू)
कलायलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बालू खामकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव सुनील रेडकर, पुणे जिल्हयाचे निवृत्त शिक्षणाधिकारी तथा वेगुल्याचे सुपुत्र प -काश परब व परीक्षक तुषार भद्रे व सुनील गुरव व कलावलपचे पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय पुनाळेकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कलावलय परिवारातील पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.