वैभववाडी : महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ, सिंधुदुर्गचे ३४ वे सिंधब्रम्ह संमेलन रविवार दि.१२ जाने. २०२५रोजी, नाधवडे ब्राम्हणदेववाडी येथील प्राथमिक शाळेत होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष अरुण गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र ब्राम्हण मंडळाचे ३४वे सिंधब्रम्ह संमेलन यावर्षी वैभववाडीत होत आहे. एकदिवसीय संमेलनाची सुरुवात सकाळी ७. ३० वा. श्री गणेश पूजनाने होणार आहे. त्यानंतर शांतीपाठ, गोपूजन, ध्वजारोहण इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनाचे उद्घाटन दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित यांच्या हस्ते होणार आहे. वैभववाडी तालुकास्तर पुरस्कार, जिल्हास्तरीय सत्कार, ब्राम्हण मंडळ परिवार संस्थाची माहिती, बक्षीस वितरण असे कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर निवृत्त मुख्याध्यापक श्रीराम मोरेश्वर गोगटे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्रात विद्यागौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्काराचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात येणार आहे. अध्यक्षांच्या भाषणाने प्रथम सत्राची सांगता होणार आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी तीन ते चार या वेळेत परस्पर परिचय करण्यात येणार आहे.रात्री ९ ते १०. ३० या वेळेत स्तोत्र पठण स्पर्धा अंतिम फेरी होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ जिल्हा उपाध्यक्ष विघ्नेश गोखले, जिल्हा कार्यवाह दत्तात्रय पुराणिक, जिल्हा सहकार्यवाय विनोद गगनग्रास, संदीप मणेरिकर वैभववाडी अध्यक्ष रामानंद गणपत्ये यांनी केले आहे.