अपघातातील जखमींच्या मदतीला 'सामाजिक बांधिलकी' धावली

Edited by: विनायक गांवस
Published on: January 09, 2025 16:44 PM
views 144  views

सावंतवाडी : बुधवारी सायंकाळी कारागृहा जवळ झालेल्या अपघातात दोन व्यक्ती जखमी झाल्या. माडखोल येथील अनंत राऊळ (वय 23) व शंकर चव्हाण (वय 74) या दोघांच्या व्यक्तींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातील चव्हाण यांना गोव्यातील बांबोळीमध्ये पाठवण्यात आले.

दरम्यान, रात्री  माजगाव येथे एका अपघातात उद्देश हजारे हे गंभीर जखमी. त्यांनाही गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले. दोन्ही अपघातात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे, संतोष गावकर यांनी मदत कार्य केले. जखमी रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांचे यासाठी आभार मानले.