स्वच्छ माझे आंगण स्पर्धेत सहभागी व्हा

गटविकास अधिकाऱ्यांचं आवाहन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 09, 2025 16:25 PM
views 201  views

देवगड : देवगडात सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात १ जानेवारी ते २o जानेवारी या काळात " स्वच्छ माझे आंगण " हे अभियान राबविण्यात येणार आहे . त्यामुळे देवगड तालुक्यातील सर्व कटूंबांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी  देवगड वृक्षाली यादव यांनी केले आहे. 

देवगडमध्ये हे अभियान प्रभावीपणे व्हावे यासाठी मंगळवारी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या आढावा सभेत विशेष नियोजण करण्यात आले. यावेळी अधिक्षक कुणाल मांजरेकर, कृषी विस्तार अधिकारी विलास कोलते, विस्तार अधिकारी कृषी लक्ष्मीकांत जोशी, विस्तार अधिकारी आरोग्य प्रतिमा वळंजु, विस्तार अधिकारी आरोग्य गंगुताई अडुळकर, कनिष्ठ अभियंता दिपक मयेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक कटुंबाने स्वच्छतेचे उच्चतम मानक राखत ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनवणे वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर आणि दैनंदिन स्वच्छतेचे पालन, घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण व पुर्नवापर, कंपोष्ट खत तयार करणे, परसबाग व सांडपाणी व्यवस्थापनसाठी, शोषखड्डा व पाझर खड्डांचा वापर करणे हे या अभियानाचे उदिष्ट्य आहे. या अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या कुटुंबांना श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येणार आहे. या अभियानात महिलाबचत गटांनी सक्रिय  सहभागी व्हावे असे आवाहन गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी केले आहे .

 अभियान अंमलबजावणी कालावधी टप्पे

  • अभियान कालावधी १/१/२०२५ते २०/१/ २०२५
  •  पडताळणी कालावधी २१/१/२०२५ते २४/१/ २o२५
  •  पात्र कटूंबांना लेखी स्वरूपात निमंत्रण देणे -२५/१/ २o२५
  • प्रशस्तीपत्र व सन्मान २६/१/ २o२५