डिजिटल शिक्षण काळाची गरज : मनिष दळवी

Edited by: विनायक गांवस
Published on: January 08, 2025 18:09 PM
views 107  views

सावंतवाडी : आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी सक्षम बनविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर त्यांना डिजिटल शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थी व शिक्षकांनी प्रभावी अध्ययन-अध्यापनासाठी करावा. उज्वल यश संपादन करून विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात न्यावे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले. तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून मनिष दळवी हे बोलत होते. 


महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन उत्साहात पार पडल. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुरेश गावडे, प्रमुख पाहुणे शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर, खजिनदार डॉ. भालचंद्र कांडरकर, संचालक अशोक वराडकर, रवींद्र परब संस्था सदस्य दादा पेडणेकर, भूषण पेडणेकर, प्रसाद पेडणेकर, देवेश कावळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, केंद्रप्रमुख श्री पावसकर, विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती विदुल पाटकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गणपत पांढरे, सहसचिव योगेश दळवी सदस्य आत्माराम तांडेल, सामाजिक कार्यकर्ते उत्तम परब, विद्यालयाचे माजी कर्मचारी गणपत कावळे, देणगीदार शांताराम वझरकर, सौ.वझरकर, आनंद भागवत, सौ. भागवत, १९९१ सालातील इयत्ता दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थी प्रसाद नागडे, बाळकृष्ण सावंत, केशव तुळसकर, प्रशांत रेडकर, तसेच माजी विद्यार्थी विवेक पेडणेकर, गंगाराम कामत, बाळू कांडरकर, उदय परब, निळकंठ नागडे, हेमंत दळवी, सौ.धावडे, श्रीमती साळगांवकर, श्री कोरगावकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. मनिष दळवी पुढे म्हणाले,  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक घेत असलेली मेहनत संस्थाचालकांचे चाललेले प्रयत्न पाहता या विद्यालयातील विद्यार्थी  विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील यावर माझा ठाम विश्वास आहे. विद्यालयाच्या भौतिक विकासात माजी विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. ही शाळेप्रति असणारी कृतज्ञता खरोखरच प्रशंसनीय आहे. यावेळी मनिष दळवी यांचा  सुरेश गावडे यांच्या हस्ते तर आनंद भागवत यांचा श्रीकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. १९८७ इयत्ता दहावीच्या वर्गाचे प्रतिनिधी बाळू कांडरकर यांचा सुरेश गावडे यांच्या हस्ते तर इयत्ता दहावी बारावीच्या वर्गाचे सुशोभीकरण करण्यासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल देवेश कावळे यांचा रवींद्र परब यांच्या हस्ते तर १९९१ इयत्ता दहावीच्या वर्गाचे प्रतिनिधी प्रसाद पेडणेकर यांचा माजी मुख्याध्यापिका विदुल पाटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच देणगीदार शांताराम वझरकर यांचा श्रीकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते तर सौ वझरकर यांचा सौ मिलन दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गणपत पांढरे यांचा सुरेश गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच केंद्रप्रमुख श्री पावसकर यांचा मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांच्या हस्ते व निळकंठ नागडे यांचा श्रीकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना ठेवीच्या योजनेतून व्याजावर आधारित दिली जाणारी पारितोषिके तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक संस्था पदाधिकारी व माजी शिक्षक यांनी ठेवलेली प्रोत्साहनात्मक पारितोषिके तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक पारितोषकांचे वितरण करण्यात आले.

  यावेळी चित्रकला व रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मनिष दळवी यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी १९९१ च्या इयत्ता दहावीच्या वर्गाने बांधून दिलेल्या रंगपटाचे उद्घाटन माजी विद्यार्थी बाळकृष्ण सावंत यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक दयानंद बांगर यांनी तर अहवाल वाचन मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी केले. उपस्थितांचे परिचय व स्वागत अंकुश चौरे यांनी केले. पारितोषिकांचे वाचन सौ. मिलन देसाई, अजित मसुरकर, दिलराज गावडे, प्रवीण गोडकर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. मिलन देसाई यांनी तर सूत्रसंचालन प्रसाद आडेलकर यांनी केले. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.