
रायगड : ज्येष्ठ कीर्तनकार पाटील महाराज यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी कीर्तनातून समाजप्रबोधनाचं खूप मोठं काम केलं. पाटील महाराज यांच्या निधनाच्या वृत्तावर अनेकांकडून दु:ख व्यक्त केलं जात
आज दिनांक 4/01/2025त्यांचे पार्थिव देह आज धाटाव येथील निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी १ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळ गावी पेण येथील (डोलवी) गावी सायंकाळी ६ वाजे दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सकाळ पासूनच रोहा येथील धाटाव या ठिकाणी शेकडो वारकरी अंत्य दर्शनासाठी येण्यास सुरुवात झाली आहे.