
चिपळूण : आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबई या संस्थे तर्फे घेण्यात येणाऱ्या १०७व्या ऑल इंडिया आर्ट स्पर्धेत सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या स्वराज कदम याने बाजी मारली आहे.
स्वराज कदम हा कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट या चित्र शिल्प कलामहाविद्यालयात शिल्पकला वर्गात शिकत असून त्याने केलेल्या "नवगुंजार "या शिल्पाची निवड झाली आहे.या स्पर्धेत निवड होणे हे विद्यार्थी कलाकार म्हणून खुप महत्वाचे मानले जाते.या वर्षी हे प्रदर्शन मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर कलादालनात दि.१८ फेब्रुवारी २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान होणार आहे.
या यशस्वी विद्यार्थ्याचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, पूजा निकम, कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव तसेच प्राध्यापक यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.