मळेवाड राणेवाडी पुलाच्या कामाचा शुभारंभ

Edited by: विनायक गांवस
Published on: December 28, 2024 19:48 PM
views 249  views

सावंतवाडी : मळेवाड राणेवाडी पुलाच्या कामाचा शुभारंभ भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कार्यक्षेत्रातील मळेवाड राणेवाडी या वाडीत जाण्यासाठी मळेवाड नदीवर एक छोटा कॉजवे होता. पावसाळ्यात मळेवाड नदी ही दुथडी भरून वाहत असल्याने ठिकठिकाणी पुरे येतो.

मात्र कमी उंचीचा कॉजवे असल्याने राणेवाडी पूरस्थिती मध्ये हा कॉजवे पाण्याखाली जात असल्याने राणेवाडीचा गावाशी संपर्क तुटायचा. यामुळे शाळकरी मुलं, नोकरदार वर्ग, त्याचप्रमाणे आभाल वृद्ध, महिला यांचा चार चार पाच पाच दिवस गावाशी संपर्क तुटायचा. यामुळे एखाद्या व्यक्तीला कोणती वैद्यकीय सेवा किंवा अन्य कोणते गोष्टीची गरज भासली तर फार मोठी अडचण व्हायची. तसेच शाळेतील मुलांचेही शैक्षणिक नुकसान व्हायचे. यामुळे या वाडीतील ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होण्यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राणेवाडीची पूरस्थिती वेळची पावसाळ्यातील परिस्थितीची माहिती करून घेवून रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागच्या बजेट मधून मळेवाड नदीवर राणेवाडीतील ग्रामस्थांकरीता एक कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर करत पुलाचे काम मंजूर केले.

हे काम होण्यासाठी मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे व राणेवाडीतील ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले. या कामाचा शुभारंभ भाजप बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला. यावेळी सरपंच सौ मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, सौ. स्नेहल मुळीक, सौ.कविता शेगडे, अमोल नाईक,अर्जुन मुळीक,लाडोबा केरकर बाळा शिरसाट अमित नाईक, रोहिदास सावंत,वसंत राणे, सदाशिव परब,शांताराम राणे, अम्या नाईक,नामदेव राणे, सुयाजी राणे,पप्पू राणे, सुरेश नाईक,बाबी कोरगावकर,बाळा रेडकर आदि उपस्थित होते.यावेळी बांदा मंडळ अध्यक्ष महेश धूरी यांनी गावाच्या विकासासाठी लागणारा निधी महायुतीच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन दिले. पुराणे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर उपसरपंच मराठे यांनी सर्वांचे आभार मानले.