दोडामार्ग : आज महिला सर्वच क्षेत्रात कर्तृत्व गाजवत ग्रामीण भागातील महिलांनी सुद्धा यात मागे राहता नये यासाठी तालुक्यातील झरे 2 ग्रामपंचायतच्या नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलाय. या ग्रामपंचायतच्या महिला सरपंच श्रुती देसाई यांनी आपल्या गावातील महिलांसाठी आज प्रत्येक घरात महिलांची गरज असलेल्या दुचाकी प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे. कोकण विकास संस्थेच्या सहकार्याने ग्रामपंचायत अंतर्गत निधीची उभारणी करून महिलांना असं प्रशिक्षण देणारी ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. सरपंच देसाई यांनी महिलांसाठी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या पायावर उभं राहीलं पाहिजे. अशातच आज दुचाकी येणं ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक वेळी महिलांना कोणत्या ना कोणत्या कामासाठी पुरुषांची वाट बघावी लागते. बाजारात जायचे असेल अंक वेळेत बस नसेल, तर घरात दुचाकी असूनही महिलांना पतीची भावाची, वडिलांची वाट बघावी लागते. आज बाजार आणणे, मुलांना शाळेत सोडणे - आणणे, नव्हे तर अनेक कामे करण्यासाठी महिलांना दुचाकी असूनही ती चालवीता येत नसल्याने पुरुषांची वाट पाहत थांबावे लागते. यावर मात करण्यासाठी किंबहुना महिलांना अधिक सक्षम, आत्मनिर्भर बनविण्यासाठी झरे नं 2 च्या सरपंच सौ. श्रुती विठ्ठल देसाई यांनी एक पाऊल पुढे टाकत महिलांसाठी खास दुचाकी प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला आहे.
त्यांना ग्रामसेवक जनार्दन खानोलकर, सदस्य पूर्वा गवस, ज्ञानेशवर सावंत, भास्कर सावंत, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे हनुमंत गवस यांसह सरगवे व आयनोडे येथील महिला वर्ग यांनी सहकार्य केले. त्यांचे गावात व तालुक्यातून या उपक्रमाबाबत कौतुक होत आहे.