मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते निलेश पारकर सन्मानित

Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2024 14:46 PM
views 68  views

सावंतवाडी : ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडीच्यावतीने केंद्रीय उर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते  सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. उच्च माध्य. व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा संघटक निलेश पारकर यांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी व त्यांच्या कार्याची दखल घेत हा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, वाय्. पी. नाईक, जावेद शेख, उदयकुमार देशपांडे, रमेश बोंद्रे, एस्. जी. साळगांवकर, एस्. आर. मांगले, विनायक गांवस, वैभव केंकरे आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्माचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे होते.

या सत्कारावेळी निलेश पारकर यांनी म्हटले की, मी जरी या सिंधुदुर्गचा सुपुत्र असलो तरी, माझे पितृतृल्य व्यक्तीमत्व वाय. पी. नाईक व ज्ञानदीप परीवारामुळे मला जिल्ह्यात एक वेगळी ओळख मिळालेली आहे. असे पुरस्कार मिळाल्याने मला सामाजिक व शैक्षणिक काम करण्यास प्रेरणा मिळते. माझे हे काम मी यापुढेही अविरतपणे चालू ठेवणार आहे असे त्यांनी आश्वासित केले. यावर्षी श्री. पारकर यांना शिक्षकेतर संघटनेचे राज्य अधिवेशन कास्ट्राईब शिक्षक संघटना, महा. राज्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देखील प्राप्त झालेत.

निलेश पारकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. उच्च माध्य. व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, गजानन नानचे (जिल्हा कार्यवाह तथा विभागीय कार्यवाह, कोल्हापूर विभाग) तसेच अनिल माने (राज्याध्यक्ष) शिवाजी खांडेकर (राज्य सरकार्यवाह) मोरेश्वर वसेकर (राज्य कार्याध्यक्ष) तसेच राज्यातील सर्व विभागीय कार्यवाह व राज्य पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.