
सावर्डे : थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती व राष्ट्रीय गणित दिनानिमित्त सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांचे गणितामधील योगदानावर प्रकाशझोत टाकणारे भित्तीपत्रक शिवलिंग सुपनेकर, तृप्ती भुवड व ओंकार शेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वृषाली निकम, कस्तुरी महाडिक व दीप्ती अवघडे या विद्यार्थिनींनी तयार केले. त्याचे उद्घाटन विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण व पय॓वेक्षक तोडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक नीलेशकुमार यादव, अश्विनी देशमुख,महेश गंगावणे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण व्हावी गणितातील संकल्पना स्पष्ट व्हाव्यात गणितीय संकल्पना चित्र रूपाने सहज सुलभ व्हाव्यात या उद्देशाने गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते पाचवी ते सातवी प्राथमिक गट व अकरावी उच्च माध्यमिक गट अशा दोन गटात प्रदर्शनाचे आयोजित केले होते. यामध्ये विविध कोनांचे प्रकार, पायथागोरस सूत्र प्रतिकृती, सोप्या पद्धतीने बेरीज व वजाबाकी करणे त्रिकोणमिती, भौमितिक रचना, वर्तुळात विविध संकल्पना आदी विषयांचा संबंध घेऊन प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या.
विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनात उस्फुर्त सहभाग नोंदवला. दोन गटात मिळून 25 प्रतिकृतीची मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली होती. या दालनाचे उद्घाटन मनोहर महाडिक व उद्योजक प्रशांत निकम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्राथमिक गटातून आराध्या थरवळ व आरोही कदम, कोमल सावंत व साफिया माद्रे, अथर्व शेंडगे व अमेय नांदिवडेकर यांच्या प्रतिकृतीने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर उत्तेजनार्थ पारितोषिक शुभ्रा आंबेकर व नैतिक कांबळे यांनी मिळवले. उच्च माध्यमिक गटातून (सम्यक पवार ,आर्यन कांबळे), (वेदिका सुर्वे, गौरी रेमजे व आयुष हुमणे, सार्थक पाटेकर, चिन्मय भुवड) (राज तांबे,यश पांचाळ,सुयोग गांगरकर व आशिष पवार, शुभम लिंगायत) यांच्या प्रतिकृतींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिक (सफा माद्रे, गौरी उदेग व श्रुती निर्मळ तन्वी गावणंग यांनी मिळवले.
या गणित प्रदर्शनात यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे आ.शेखर निकम,संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, संचालक शांताराम खानविलकर,सचिव महेश महाडिक, उद्योजक प्रशांत निकम, मनोहर महाडिक, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण,पय॓वेक्षक उध्दव तोडकर यांनी अभिनंदन केले आहे.