
दोडामार्ग : तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील मूळ सरगवे येथील झरे- 2 सरगवे पुनर्वसन येथील सौ.सत्वशिला शिवाजी देसाई ( वय ५८ ) यांचे बुधवारी सकाळी ७.२५ वा. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पत्रकार ओम देसाई यांच्या त्या मातोश्री होत. सौ. देसाई या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अशा अकाली निधनाने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.