
वैभववाडी : तालुका खरेदी विक्री संघामार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या भात खरेदीचा आज (ता.२४) सि.जि.बॅकेचे संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. शहरातील राजापूर अर्बन बँकेच्या समोरील परिसरात हा शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला.
तालुका खरेदी विक्री संघामार्फत दरवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शासकीय दराने भात खरेदी केली जाते. याही वर्षी संघामार्फत भात खरेदीच्या पहील्या केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. शेतक-यांच्या मागणीनुसार गेल्या वर्षी तालुक्यातील पाच केंद्रावर भात खरेदी करण्यात आली होती. यावर्षी तालुक्यातील पहील्या केंद्रांचा आज शुभारंभ झाला.
यावेळी चेअरमन प्रमोद रावराणे, व्हा.चेअरमन अंबाजी हुंबे, जयेंद्र रावराणे, सुधीर नकाशे, महेश गोखले, गुलाबराव चव्हाण, बाळा राणे, पुंडलिक पाटील, रत्नाकर बंदरकर, उत्तम सुतार, महेश राणे, संजय रावराणे, सुशील रावराणे, प्रकाश पाटील, रमेश सुतार यासह तालुक्यातील विविध विकास सोसायटीचे चेअरमन, सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.