
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनविभागा मार्फत उपद्रवि माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी जलद कृती दल ही समिती नेमण्यात आली असून या टीम कडून दोडामार्ग तालुक्यातील मणेरी व कुडासे या गावात एकूण 226 लाल तोंडी माकडे पकडण्यात आल्याचे वनविभागकडून सांगण्यात आले. त्यामुळे माकडां पासून शेतकऱ्यांच्या शेतीचे आता नुकसान थांबणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान मानले आहे.
दोडामार्ग तालुक्यात वन्य प्राणी हंत्ती, गवेरेडे माकड यांपासुन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले जात आहे याच धरतीवर वनविभाग सिंधुदुर्ग यांच्या मार्फत जलद कृती दल ही विशेष समिती नेमण्यात आली आहे. या जलद कृती दल मार्फत दोडामार्गच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपद्रव माजवणाऱ्या लालतोंडी माकडांनाचा बंदोबस्त करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. हे विशेष दल सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी फिरत असल्याचे तालुक्यातील मणेरी ग्रामपंचायतला समजताच त्यांनी सावंततवाडी वनविभाग यांच्या लेखिस्वरूपात अर्ज केला की मणेरी गावात लालतोंडी माकड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत त्यामुळे त्यांचा बदोबस्त करा अशी मागणी केली होती याच पाश्वभूमीवर वनविभागच्या जलद कृती दल या टीमने मणेरी गावात 200 माकडं पकडली, तर कुडासे गावांत 26 माकडं पकडली अजूनही कुडासे गावात माकडं पकडण्याची ही मोहीम सूररु असल्याचे त्या टीम कडून सांगण्यात आले. जलद बचाव पथक सावंतवाडी वन विभाग. दत्ताराम बापुराव देसाई, राजाराम अमृतराव देसाई, विनोद शेट्ये, दिलीप कुडासकर, तुषार देसाई, प्रसाद कुडासकर, अशोक गवस, रामा राऊळ, लक्ष्मण जाधव, गोपाळ जाधव, भागयेश कोठावळे. प्रथमेश गावडे, देवेंद्र परब, आनंद राणे, पुंडलिक राणे, गोपाळ सावंत कुडासे ग्रामस्थ आदी उपस्तित होते.
नैसर्गिक अधिवासात सोडणार...
दरम्यान या जलद कृती दल यांना या संदर्भात विचारणा केली असता सदरील पकडलेली लालतोंडी माकड ही नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येतात. त्यांना कुठच्या ही परकारचा धोका निर्माण होणार नाही या हेतूने ही माकडे सोडण्यात येत आहे. दोडामार्ग तालुक्यातील अजूनही काही काही गावांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. असे वनवीभागाकडून सांगण्यात आले.
वनविभागाचे कौतुक
तालुक्यात उपडद्रव माजवीणाऱ्या लालतोंडी माकडांचा वनवीभागा मार्फत बंदोबस्त करण्यात येत आहे. आता पर्यंत मणेरी, कुडासे या गावातील 200 हुन अधिक माकडे वनवीभागाने पकडली आहे त्यामुळे आम्ही मणेरी व कुडासे ग्रामपंचायत ने वनवीभागाचे धन्यवाद मानले आहे. त्यामुळे तालुक्यातून वनवीभागाचे शेतकऱ्यांमधून कौतुक केले जातं आहे.