माळरानावर वणवा पेटला ; यतीन खोत यांच्या पुढाकाराने अनर्थ टळला

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 17, 2024 13:40 PM
views 242  views

मालवण : ओझर हायस्कुलच्या मागील बाजूस शेलटी माळरानावर सोमवारी सकाळी मोठी आग लागली. याबाबत माहिती मिळताच माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी मालवण नगरपरिषद अग्निशमन यंत्रणेस माहिती दिली. तात्काळ अग्निशमन यंत्रणा, पालिका कर्मचारी, फायर बुलेट रवाने झाले. स्थानिक ग्रामस्थ, पालिका कर्मचारी व अग्निशमन यंत्रणा यांच्या मदतीने अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. 

याबाबत माहिती देताना शिल्पा खोत यांनी सांगितले, मालवण नगरपरिषद येथील फायर बुलेट काय करू शकते याच उत्तम उदाहरण शेल्टी ओझरला लागलेला भयाण वणवा वेळी दिसून आले. दुसरीकडे आपल्या नगरपरिषद फायरफायटरने केलेली कामगिरी याबद्दल मालवण नगरपरिषद, कर्मचारीवृंद तसेच एमएसईबी मालवण अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका महत्वाची ठरली. यतीन खोत व मित्रमंडळ पुढाकार घेऊन कार्यरत होते.

सकाळी अकराच्या सुमारास यतीन खोत यांना ओझर विद्यामंदिरचे शिक्षक यांचा फोन आला. तर सर्पमित्र पर्यावर्णप्रेमी स्वप्नील परुळेकर यांनी मला फोन केला. लागलीच नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जीरगे साहेब यांना माहिती देत अग्निशमन देण्याबाबत विनंती केली. फायर फायटर जो तत्कालीन नगरपरिषद बॉडी आणि नगरपरिषद प्रशासन यांच्या प्रयत्नातून आलेला तसेच फायर बुलेट देखील यांच्या संयुक्त मदतीने अश्या प्रमाणे लागलेले असे वणवे विजवण्यात तत्पर आपल्या नगरपरिषद कर्मचारीवृंद यांचे कौतुक आहे. वीज व अन्य सेवा बाबत अधिकारी यांना सूचित करताच काम झाले. 

मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते, पोलीस कर्मचारी सुशांत पवार, पोलीस चालक येरम, पालिका कर्मचारी महेश परब, वैभव वळंजू (फायर बुलेट), सागर जाधव, वसंत शिर्सेकर (फायर फायटर ऑपेरेटर), भूषण जाधव, शेल्टी ग्रामस्थ, रेवंडी ग्रामस्थ विराज कोदे, निखिल शिंदे, स्वप्नील परुळेकर, प्रथमेश करळकर, नरेश करळकर, संजय कांबळी, जगदीश कांबळी, प्रसन्न कांबळी, प्रितेश मयेकर, रवींद्र कांबळी, अरविंद तळाशीळकर, संजय वेंगुर्लेकर, निलेश वेंगुर्लेकर व यतीन खोत व सौ. शिल्पा खोत मित्रमंडळ यासह सर्वांच्या प्रयत्नातून आग आटोक्यात आली. लगतंच एका ग्रामस्थ यांचे लाकूड साहित्य मोठया प्रमाणात होते. त्या ठिकाणी आग भडकून मोठे नुकसान होण्याची भीती होती. तसेच आग वाढण्याची भीती होती. त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच मोठया झाडांवर आग पसरून वन्य पक्षी  वगरे यांना धोका होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली. आग नियंत्रणात आली.