स्टेपिंग स्टोन स्कूलमध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन

Edited by: विनायक गांवस
Published on: December 17, 2024 12:34 PM
views 256  views

सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भरभरून यश मिळवत उत्तुंग भरारी घेतली. यामध्ये इयत्ता तिसरीतील श्रीहान प्रशांत मुंज याने कलारिंग कॉम्पिटीशनमध्ये राष्ट्रीय प्रथम क्रमांक पटकावला आणि स्केट स्कूटर व ट्रॉफीवर आपले नाव कोरले. 

इयत्ता सहावी मधील अस्मी अमेय प्रभू तेंडोलकर हिने कोलाज मेकिंग कॉम्पिटीशनमध्ये राष्ट्रीय पाचवा क्रमांक पटकावला आणि मॅग्नेटिक चेस बोर्ड व सिल्व्हर मेडल प्राप्त केले. इयत्ता सहावी मधील तनिष्क राजेश पवार याने फिंगर अँड थंब कॉम्पिटीशनमध्ये आर्ट मेरिट अवॉर्ड व ट्रॉफी प्राप्त केली. इयत्ता पाचवी मधील सौजन्या सत्यवान काजरेकर हिने हँडरायटींग कॉम्पिटीशनमध्ये आर्ट मेरिट अवॉर्ड व ट्रॉफी प्राप्त केली. इयत्ता चौथी मधील लिशा जगन्नाथ सामंत हिने कलरिंग कॉम्पिटीशनमध्ये आर्ट मेरिट अवॉर्ड व ट्रॉफी पटकावली. इयत्ता दुसरी मधील राधिका विनायक शेटकर कलरिंग कॉम्पिटीशनमध्ये आर्ट मेरिट अवॉर्ड व ट्रॉफी प्राप्त केली.