
सावंतवाडी : परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज यांच्या आज्ञेने प्रस्थापित सावंतवाडी भटवाडी येथील दत्त मंदिरात १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता लघुरुद्र, अभिषेक, दत्तपूजा, सायंकाळी पाच वाजता ह. भ. प. अवधूत बुवा धूपकर (पिंगुळी-कुडाळ) यांचे कीर्तन, त्यानंतर दत्तजन्म, रात्री आठ वाजता नामस्मरण, रात्री नऊ वाजता भजन होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट भटवाडी-सावंतवाडी यांनी केले आहे.