कुळवंडी विद्यालयामध्ये उद्यापासून विज्ञान प्रदर्शन

शेखर निकम यांची उपस्थिती
Edited by: मनोज पवार
Published on: December 10, 2024 15:14 PM
views 216  views

 खेड : जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती, शिक्षण विभाग व सह्याद्री शिक्षण संस्था संचलित तालुक्यातील कुळवंडी येथील श्री शिवशंकर माध्य व उच्च माध्य. विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत विद्यालयात ५२व्या तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांनी दिली.

शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा विज्ञान प्रदर्शनाचा विषय आहे. ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते ५ या वेळेत नावनोंदणीसह प्रदर्शन मांडणी होईल. १२ डिसेंबर रोजी आमदार योगेश कदम, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सह्याद्री शिक्षण संस्थाध्यक्ष बाबासाहेब भुवड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होईल.

याप्रसंगी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी बी.एम. कासार योजना शिक्षणाधिकारी किरण सुवर्णा सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय कल्पे, कुळवंडी स्कूल कमिटी चेअरमन दगडू निकम, विज्ञान प्रदर्शन समिती अध्यक्ष दिलीप निकम, सरपंच विष्णू निकम, उपसरपंच संचिता जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर दुपारी २ ते ५ या वेळेत परीक्षण व विज्ञान प्रदर्शन खुले होईल. १३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत प्रश्नमंजुषा व परीक्षण विज्ञान प्रदर्शन खुले राहिल. दुपारी २ ते ४ या वेळेत बक्षीस वितरण झाल्यानंतर समारोप होईल.

याप्रसंगी उपस्थितबराहण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, मुख्याध्यापक वसंत यादव, कार्यक्रमप्रमुख तथा विस्तार अधिकारी एस. डी. भोसले, विस्तार अधिकारी लिना भागवत, एस. के. शिगवण, टी. के. काझी, बी. जे. शिर्के, केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष सुरेश आखडमल, केंद्रप्रमुख सदाशिव राठोड, महेंद्र जाधव, तालुका विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा सनिता बेलोसे यांनी केले आहे.