
देवगड : देवगड तालुक्यातील मिठबांव येथील श्री रामेश्वर प्रासादिक मंडळ श्री देव विठ्ठल रखुमाई समता मंदिर येथे मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी रात्रौ ९.३० वाजता एकात्मिक विकास मंडळ मोर्वे यांच्या रंगी रंगला विठ्ठल या कार्यक्रमाचे आयोजन माजी सभापती सुनील पारकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री.रामेश्वर प्रासादिक मंडळ मिठबांव, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.