'सामाजिक बांधिलकी'चा वृद्ध महिलेला आधार

Edited by: विनायक गांवस
Published on: December 07, 2024 19:48 PM
views 297  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा जळगाव येथील एका वृद्ध महिलेला आधार दिला. कामाच्या शोधात जळगाव वरून आलेली वृद्ध महिला व तिचा मुलगा गेले तीन दिवस सावंतवाडी बस स्टॅंडवरच राहत होते. 

आज दुपारी एकच्या सुमारास त्या वृद्ध महिलेचा मुलगा तिला बस स्टॅंडवर सोडून गेला त्यावेळी वृद्ध महिला आपल्या मुलाला हाका मारून रडत होती. दोन जड बॅगा घेऊन ती मुलाला शोधण्यासाठी फिरत असताना सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी पाहिले. वृद्ध महिलेजवळ जाऊन तिची  विचारपूस करून सर्व माहिती घेतली. तिच्या हातातील दोन्ही बॅगा घेऊन तिला बस सावलीत बसवलं.

सावंतवाडी पोलीस बीड हवालदार पी के कदम यांना याची कल्पना दिली असता त्यांनी लगेच दखल घेतली. पोलीस ठाण्यावरून पोलीस बीट हवालदार महेश जाधव यांना पाठवलं. तोपर्यंत तिचा मुलगा एक तासानंतर तेथे आला. पोलिसांनी त्याच्याकडून सर्व माहिती घेऊन त्यांना लगेचच त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली.