'होम मिनिस्टर' सविता राठोड पैठणीच्या मानकरी

उपविजेत्या रिया साळुंखेंना सोन्याची नथ
Edited by: मनोज पवार
Published on: December 07, 2024 19:40 PM
views 167  views

मंडणगड : नारी शक्तीचा सन्मान करण्याकरिता भारतीय जनता पार्टी तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने 6 डीसेंबर 2024 रोजी महिलांसाठी भिंगळोली येथे आयोजीत केलेल्या होम मिनिस्टर  पैठणीच्या खेळाचे विजेतपद सौ. सविता राठोड यांनी मिळवीले त्यांना आयोजकांवतीने विजेतपदाच्या येवला पैठणी भेटवस्तु व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत थोडक्यात विजयाची संधी हुकलेल्या रिया साळुंखे यांना उपविजतेपदावर समाधान मानावे लागले, उपविजतेपदाची सोन्याची नथ स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा आयोजकांचेवतीने गौरव करण्यात आला.

परिसरातील शंभरहून अधिक महिला होम मिनिस्टर चला खेळू खेळ पैठणीच्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या सिने अभिनेत सचिन श्रीधर यांनी ओघवत्या शैलीतील बहरदार निवेदनाने तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या  या स्पर्धेची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी आयोजकांच्यावतीने भेटवस्तु देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार सुर्यकांत दळवी, श्रीराम इदाते, प्रकाश शिगवण, तालुका अध्यक्ष अप्पासाहेब मोरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष अप्पासाहेब मोरे, प्रविण कदम, विजय दरिपकर, गिरीष जोशी, यश मेहथा, भावेश लाखण, मकरंद रेगे, ओकांर महाजन, राजेश नगरकर, वैभव नारकर, महेश महाजन यांच्यासह पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.