अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी सशर्त जामीन मंजूर

Edited by: विनायक गांवस
Published on: December 07, 2024 17:49 PM
views 269  views

सावंतवाडी : शहरातील अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी आरोपींची न्यायालयाने सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे. आरोपी तर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राहय मानून सहा जणांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.

२७ नोव्हें. रोजी श्री. डिसोजा यांच्या रात्री मोबाईल फोनवर उज्वल डाफळे यांनी रात्री 8.20 वाजता फोन केला. आरोपी उज्वल डाफळे यांनी जखमी डिसोजा यांना भेटायला बोलवून जखमी डिसोजा यांना मारहाण केली. त्यापैकी आरोपी तुषार तुळसकर यांनी जखमी डिसोजा यांनी आरोपी यांस शिवीगाळ केली या रागाने तुळसकर यांनी फिर्यादी यांना हाताच्या ठोशाने  तोंडावर मारले. त्यामध्ये डिसोजा यांचा खालील जबड्यातील एक दात तुटला. हातातल्या काठीने जखमीच्या उजव्या पायावर मारहाण केली. यामध्ये अशा एकूण १६ जणांचा समावेश होता. त्यांचे विरुध्द भारतीय न्याय संहीता कलम ११७ (२), १८९ (२), १९१ (२), १९०, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यातील आरोपी उज्वल महेश डाफळे, तुषार विनायक तुळसकर, रितेश राजेश सावंत, ओंकार अनिल गावकर, दर्शन नरसिंह गवस, प्रभु साबान्ना कामनेट्टी रा. सालईवाडा सावंतवाडी यांना दि. ३०नोव्हे.२०२४ रोजी अटक करुन सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करुन ३ दिवसाची पोलिस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने आरोपी तर्फे अॅङ परशुराम चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय मानून पोलीस कोठडी नाकारुन सहा जणांना न्यायालयीन कोठडी मंजुर करण्यात आली होती.

आरोपी तर्फे अॅड परशुराम चव्हाण यांनी जामीन अर्ज दाखल करुन त्यावर युक्तीवाद केला. आरोपी तर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राहय मानून त्यांची रुपये पंचवीस हजार मात्र च्या सशर्त जामीनावर आरोपीची मुक्तता करण्यात आली. आरोपी तर्फे अॅड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.