मूळगावी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

Edited by: मनोज पवार
Published on: December 06, 2024 21:32 PM
views 207  views

मंडणगड : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त  तालुक्यातील आंबडवे या मुळगावी महामानवास अभिवादन करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी स्मारकात अस्थीकलश व बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

 या कार्यक्रमास मंडणगडचे प्रभारी तहसीलदार संजय गुरव, महसूल नायब तहसीलदार श्री. खानविलकर, पोलीस निरीक्षक नितीन गवारे,  महसुलचे कार्यालयातील अधिकारी सुरज गायकवाड, तलाठी मनोहर पवार, नगरसेवक आदेश मर्चंडे, मंडणगड नगरपंचायतीचे अधिकारी मनोज मर्चंडे, माजी नगरसेवक राजेश मर्चंडे, ग्रामस्थ सुदाम सकपाळ, शिक्षक नरेंद्र सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन सकपाळ, रंजन धोत्रे व आंबडवे पंचक्रोशीतील नागरीक उपस्थित होते. दिवसभर तालुका व तालुक्या बाहेरील अनुयायांनी स्मारकास भेट देत महामानवास अभिवादन केले. यावेळी ग्रामस्थ मंडळाचेवतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.